Saturday, October 1, 2011

Saturday, June 25, 2011

Tuesday, June 14, 2011

भक्ती-सेवा सप्ताह ? हा तर अनिरुद्धोत्सव....!

पुण्यात नुकताच भक्ती-सेवा सप्ताह संपन्न झाला त्याबद्दल संजयसिंह गंभीर यांनी दिलेली  माहिती ------  

भक्ती-सेवा सप्ताह ? हा तर अनिरुद्धोत्सव....!

 

मित्रांनो,आपण नुकताच श्री वरदाचंडिका प्रसंनोत्सव अनुभवला...प.पूज्य बापू,नंदाई आणि सुचित दादा या परमात्मत्रयींनी संपूर्ण मानवी पातळीवर आपल्या सर्वांसाठी अविरतपणे घेतलेले अविश्रांत भगीरथ प्रयास,कष्टही आपण पाहिले.आपला बापूच आपल्या कल्याणासाठी,सुख-आनंदासाठी सदासर्वदा सर्वथैव झटत असतो हे पुन्हा एकवार सिद्ध झाले.आपल्या आईचा - महिषासुरमर्दिनीचा  कृपाशिष सर्वांना प्राप्त व्हावा यासाठी बापूंनी या उत्सवाची निर्मिती करताना घेतलेले परिश्रम अतिशय विलक्षण..! या काळात बापू किती कमी वेळ झोपले असतील किंबहुना झोपले असतील की नाही हे त्या चन्डीकेलाच ठाऊक...!     अशा या `विश्वातील एकमेव` दात्याला आपण काय देऊ शकतो ? खरं तर, काहीच नाही... पण किमान भक्ती-सेवा माध्यमातून कृतज्ञता तर व्यक्त करू शकतो..!            पुणे उपासना केंद्रातर्फे दि. ५ जून ते १२ जून २०११ या काळात   दु,१२ ते रात्रौ ९ या वेळेत सेवा सप्ताहाचे आयोजन केलेले आहे. दररोज प.पूज्य बापूंच्या चिन्मय पादुकांचे पूजन होऊनच उपक्रमांना प्रारंभ होईल. `चरखा` योजनेअंतर्गत लडी काढणे,`जुनं ते सोनं`अंतर्गत कपडे sorting व packing ,श्रीगणेशमूर्ती सेवा,`मायेची उब`अंतर्गत गोधडी सेवा या व अशा सेवांबरोबर श्रीमदपुरुषार्थ ग्रंथराजाचे तीन खंड,रामरसायन,श्री साईसच्चरित, मातृवात्सल्यविन्दानम यांचे सामुहिक पठण होणार आहे. प.पूज्य बापू ,नंदाई आणि सुचितदादा यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची याहून अधिक चांगली संधी असू शकेल ?   स्थळ: MODERN HIGH SCHOOL  ,शिवाजीनगर, पुणे.
----------------------------------------------------
 

भक्ती-सेवा सप्ताहास सुरुवात उत्साहात...!

प.पूज्य बापू, नंदाई, सुचितदादा यांच्या कृपाशिषाने भक्ती-सेवा सप्ताहाला उत्साहात प्रारंभ झाला. उपक्रमाची सुरुवात उपक्रम स्थळाच्या स्वच्छतेने झाली. यावेळी पर्जन्यराजाने दणदणीत सलामी देऊन उपक्रमास शुभेच्छा दिल्या..प.पूज्य बापूंच्या चिन्मय पादुकांच्या आगमनाचे वेळी मात्र त्याने `मौन` पाळले...प.पूज्य बापूंच्या चिन्मय पादुकांच्या पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी विशेष म्हणजे पुणे केंद्राने आवाहन केल्याप्रमाणे अशा मंडळींना पूजनाचा लाभ मिळाला ज्यांना इच्छा असूनही काही अडचणींमुळे,घरातील निष्कारण विरोधामुळे त्यांच्या घरी पादुका पूजन करता येत नाही.. केंद्राच्या या आवाहनाला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि बापुकृपेने त्यांना आनंद देता आला. त्यानंतर झाला `सत्य प्रवेश`...पुढे श्रीगुरुचरित्र अध्यायांचा मेरुमणी अध्याय १४ वा चे पठण झाले..आणि त्यानंतरचा कळस गाठणारा संतश्रेष्ट श्री ज्ञानदेवांचा `हरिपाठ`...!              
 `आजचा दिनु ऐसा गोड जाहला...`!!
























 -------------------------------------------------------
 भक्ती-सेवा सप्ताहाचा आज दुसरा आनंद दिन..! 
आजच्या दिवसाची सुरुवात प.पूज्य बापूंच्या चिन्मय पादुकांच्या पूजनाने झाली. प्रथमच पादुका पूजन करणाऱ्या आजच्या मंडळींना त्यांच्या डोळ्यांतून येणाऱ्या अश्रूंना सोबत घेऊनच येत होता. आज सेवा उपक्रमांना सुरुवात झाली ती भक्त-कार्यकर्त्यांच्या उदंड उत्साहात...! आज `मायेची ऊब` अंतर्गत एकूण 13 गोधड्या तयार झाल्या. `प.पूज्य नंदाईच्या लेकी` अगदी तल्लीन होऊन सेवा करताना पाहायला मिळाल्या.`चरख्याचे` चक्रसुद्धा वेगात होते.एकंदर ३६ चरख्यांची मांडणी केली गेली.दिवसअखेर 35 तयार लडी व 150 भरलेल्या बॉबिन्स बापूचरणी अर्पण करण्यात आल्या. `गणेशमूर्ती`सेवेस मिळालेला प्रतिसादही उल्लेखनीय होता. आकर्षक आणि अर्थपूर्ण सजावट असलेल्या या कक्षात एकंदर 75 गणेशमूर्तींच्या finishing चे 25 % काम पूर्ण करण्यात आले. तसेच कागदाच्या लगद्याचे 103 गोळे तयार झाले. आजची सर्वांत प्रशंसनीय सेवा म्हणजे `जुनं ते सोनं`अंतर्गत झालेली सेवा ! काही तासांच्या कालावधीत एकूण 411 कुटुंबांतील अंदाजे 1650 व्यक्तींच्या कपड्यांचे स्त्री-पुरुष-वृद्ध-लहान बालके यांच्या वयोगटानुसार वर्गीकरण करून त्यांचे व्यवस्थित packing करण्यात आले. या सेवेत आपापल्या कुवतीनुसार सर्व वयोगटातील सर्व जणांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून बापू नक्कीच आनंदले असतील..!श्रीमदपुरुषार्थ ग्रंथराजाचे, मातृवात्सल्यविन्दानमचे, गुरुचरित्राच्या १४ व १८ व्या अध्यायांचे पठण हे सेवा `समर्पित` भावाने करण्याची शिकवण देणारे होते. सेवा करताना नकळत जागृत झालेला अहंभाव `त्याच्या` नामसंकीर्तनात विरघळून जातो याची पुनःप्रचीती आली.     नंतर पुन्हा `हरिपाठा`ने दिवसाची पूर्तता झाली...अतिशय तृप्त भावनेने...!

-------------------------------------------------------------

भक्ती-सेवा सप्ताह : दिवस तिसरा !

 ७ जून २०११ ! आजच्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे प.पूज्य बापूंच्या पादुकापुजनाने झाली. आणखी ५ नवीन मंडळींना पूजनाचा लाभ मिळाला.विशेष म्हणजे आज  पूजन सांगायला होते पुणे केंद्राचे प्रमुख सेवक प्रवीणसिंह वाघ..!अत्यंत भावपूर्ण वातावरणात श्री अनिरुद्धांचे पूजन संपन्न झाले.    आज `गणेशमूर्ती`सेवेअंतर्गत कक्षात केलेली सजावट अप्रतिम होती. `नवविधा भक्ती`च्या प्रत्येक पायरीवर मुर्तीप्रक्रियेचा एकेक टप्पा हि कल्पनाच खूप सुंदर..! बापूंवरील  वृद्धिंगत होत जाणारे प्रेम नवनवीन कल्पनांना जन्म देते हेच खरं..! लगद्याचे एकंदर 100 गोळे तयार झाले व 30 मूर्तींचे फिनिशिंग केले गेले.प.पूज्य नंदाईच्या लेकीसुद्धा आज फुल्ल फॉर्मात होत्या.. 70  लेकींनी  एकेंदर 18 गोधड्या तयार केल्या..!  आनंदे गुरुमाय...!`जुनं ते सोनं` अंतर्गत आज 149 कुटुंबातील 600 लाभार्थींच्या कपड्यांचे वर्गीकरण व बांधणी (packing) करण्यात आली.  आज `चरखा`ही जोरातच फिरत होता.एकूण 100 लडी आणि 205 बॉबिन्स बापूचरणी अर्पण करण्यात आल्या. ( achievement ना ? )        दिवसअखेरचा `हरिपाठ` हा उर्जास्त्रोत ठरतोय...त्यानंतरचा सत्संग हा, ज्यांचं बापूंवर मनापासून प्रेम आहे आणि ज्यांना म्हणून `त्याचं`नाम आळवावंसं  वाटतं,अशा श्रद्धावानांकडून सादर केला जातो. `गायकी`नाही तर बापूंना अपेक्षित `भाव` असणारे बरेच `भावगायक` बापू सर्वांसमोर आणत आहेत...! मी `गायक`आहे हा विचार न ठेवता मी `त्याचा`सेवक आहे हा भाव ठेऊन बापूनाम घेणाऱ्यावर बापू खूष होताना दिसत आहेत.        तिसरा `भाव`पूर्ण दिवस संपन्न...!
-------------------------------------------------------------

भक्ती-सेवा सप्ताह : दिवस चौथा !


 आजचा दिवस भक्तिपेक्षा कांकणभर जास्त सेवेचाच..! पहाटे ठीक 6 वाजता पुण्याहून 35 - 40 कि.मी.अंतरावरील कासारसाई गावात आपले केंद्राकार्यकर्ते रवाना झाले. कार्यक्रमस्थळी ती मंडळी आली ती दोन ट्रक भर कपडे घेऊनच..! `जुनं ते सोनं` अंतर्गत या कपड्यांचे MEGA SCALE वर sorting झाले.(किती म्हणून विचारताय? कृपया फोटो पहा.) `मायेची उब ` कक्षात आज 11 गोधड्या तयार झाल्या. आज या सेवेत सिंहांनीसुद्धा सहभाग घेतला..(`आम्हालाही येतं` हे दाखवायला नाही बरं का ! )      `गणेशमूर्ती`सेवेत आज 75 गोळे तयार होऊन 55 मूर्तींचे फिनिशिंग केले गेले.              `चरखा`सुद्धा आज वेगात..! एकंदर  190 लडी100 बॉबिन्स बापूचरणी अर्पण ...!  `सत्संग` म्हणजे दिवसभराचा थकवा विरघळवून टाकणारं tonic ! आजही कोण प्रमुख,कोण कार्यकर्ता,कोण भक्त काही कळत नव्हतं....माझ्या बापूसमोर सगळे समान पातळीवर ! `बापू भक्त` ही एकच आणि खरी ओळख..! 
----------------------------------------------------

भक्ती-सेवा सप्ताह : दिवस पाचवा...!


आजचा दिवस खूपच वेगळा...! `जुनं ते सोनं` अंतर्गत  काल झालेले mega scale sorting च्या वाटपाचा आजचा दिवस. पुणे जिल्ह्यातील खेड व मुळशी तालुक्यातील वाटपासाठी आज 5 टीम्स सकाळी  ८ वा.निघाल्या.बापूकृपेने मला या सेवेत जायला मिळालं. तिथे पोहोचताना व  पोहोचल्यानंतर ज्या कार्यकर्त्यांनी हा सर्व्हे केला त्यांना मनापासून सलाम केला. इतक्या दुर्गम भागात खडतर  मार्गाचा हा सर्व्हे त्यांनी कसा केला? एकच उत्तर-त्यांच्या पाठीशी असलेल्या बापू या शक्तीमुळेच.! ज्यांना वाटप केलं गेलं त्यांच्याकडे पाहिलं तर बापूंनी आपल्याला किती सुखात ठेवलंय याची तीव्रतेने जाणीव होते. वाटपात मिळालेल्या वस्तूंमुळे लाभार्थींच्या चेहऱ्यावरील आनंद  पाहणं हा एक अनुभवच... प्रतिकूलता तिथेच जाणीव हेच खरं..! आपण खूप अनुकूलता असूनही सारखे कुढत असतो. तसाच अनुभव प्रथमच बापूंच्या चिन्मय पादुकांचं पूजन करणाऱ्या श्रद्धावानांना  झालेल्या  अतीव आनंदाचे चेहरे पाहताना येतो. आपल्याला सहजप्राप्त गोष्टींची किंमत लवकर कळतच नाही. बापूंचं पादुकापूजन करायला मिळणं ही बापूंची आपल्यावर कृपा आहे,आपण काही श्रेष्ठ भक्तीची गाठोडी घेऊन आलेलो नाहीत याचा आपल्याला सोयीस्कर विसर पडायला लागतो. मग आपण पादुकापुजनासाठी वाढदिवसासारखे मुहूर्त   पाहू  लागतो. तो मात्र आपल्याला सदैव साथ देत असतो,मदत पुरवत असतो..मुहूर्त न पाहता...! बापू आपल्याला दिसतात,त्यांना पाहता येतं,त्यांच्याबरोबर नाचता-हसता येतं याचं महत्त्व  आपल्याला कितपत स्मरणात राहातं कोण जाणे. आपल्याला सर्व सहज वाटू लागतं आणि मग येतो casual approach.. बापू काय दर गुरुवारी दिसतात, गुरुक्षेत्रमला असतात..अरे ,बापू लाख सांगोत,  `मी तुमचा मित्र आहे` तो त्यांचा मोठेपणा झाला, पण तो सर्व देवांचाही देव आहे याची जाणीव आपण दर श्वासाला आपण ठेवायला हवीय आणि सतत कृतज्ञ राहायला हवं.! या कृतज्ञतेसाठी तरी या देवाचं पादुकापूजन अगदी MUST .. खरंच या सेवा सप्ताहाने अनेक स्तरांवर  मला चिंतनशील  केलंय..      आज `मायेची ऊब`अंतर्गत नंदाईच्या लेकींनी 21 गोधड्या तयार केल्या. आता कालपासून सिंहसुद्धा या सेवेत पुढे सरसावले आहेत बरं..! `गणेशमूर्ती`सेवेत  लगद्याचे 75 गोळे,10 मूर्ती फिनिशिंग तसेच 25 मूर्तीवर रंगकाम केले गेले. `चरखा` नेहमीप्रमाणेच जोरात...171 लडी बापूचरणी  अर्पण..  आजचे `जुनं ते सोनं` अंतर्गतच्या वाटपाचे लाभार्थी- तब्बल 3300 !      Bapu Thy Grace !!! छान सेवेमुळे `सत्संग` tonic चा डोस चांगलाच रंगला...! फुल्ल धमाल ....

-----------------------------------------------

 भक्ती-सेवा सप्ताह - दिवस सहावा..!


आजचा दिवस आधीच्या पाच दिवसांचं सार्थक करणारा..! भक्ती-सेवेचं परिपूर्ण मूर्ती असणारे पूज्य समीरदादा आज उपक्रमस्थळी आले. शांत,सात्त्विक,प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे समीरदा आल्याने सर्वांचा उत्साह अमाप  वाढला. कार्यकर्त्यांचंच  काय  पर्जन्यालाही समीरदर्शनानं  भरतं आलं अन तो बरसला...  पू.समीरदांनी प्रत्येक कक्षात जाऊन  प्रत्येक गोष्टीची माहिती घेत सर्वांशी मनमोकळा संवाद साधला. 
पूज्य समीरदादा `श्री अनिरुद्ध चालिसा`  पठणालादेखील बसले. पुणे केंद्रकार्यकर्त्यांच्या मनात तरी ही नक्कीच भावना आहे की पूज्य समीरदांचं  येणं म्हणजे साक्षात बापूंचं येणं...आणि असा आजवरचा अनुभव व परंपरा म्हणा की समीरदा येऊन गेले की लवकरच बापू येतात. म्हणजे आता लवकरच....या सप्ताहाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणत्याही समित्यांची, समितीप्रमुखांची आखणी केलेली नसतानाही सर्वजण शिस्तबद्ध सेवा करताना पाहायला मिळत आहेत. कोणालाही कोणत्याच सेवा शिफ्ट्सच्या बंधनात अडकवून न ठेवतासुद्धा प्रत्येकजण स्वतःला बापुंमध्ये अडकवून घेताना दिसतोय. मी आणि माझा देव फक्त बस्स. ..बाकी काही विचारच नाही...!   आणि हेच या सप्ताहाचं खरं यश आहे. हा सप्ताह मला माझ्या देवाशी, माझ्या बापूशी भक्कमपणे जोडणारा दुवा ठरतोय हे मात्र 108 %.. आज सर्व सेवाकार्यात `समीरण` effect पाहायला मिळाला..प.पू.नंदाईच्या लेकींनी, आणि आता लेकरांनीसुद्धा, `मायेची उब` अंतर्गत  तब्बल 25  गोधड्या शिवल्या..!  `रंगात रंगू लागलाय गजानन..` आता `गणेश मूर्तींना` रंगकाम सुरु झाल्याने त्या कक्षाचा रंग वेगळाच दिसू लागलाय..
----------------------------

भक्ती-सेवा सप्ताह : दिवस सातवा...

 किती सुंदर सुरु आहे हा सेवा सप्ताह ! नास्तिकालाही आस्तिक बनवेल असा, श्रद्धावानाला बापूचरणी आणखी घट्ट बनवेल असा... रोज सर्वप्रथम प.पूज्य बापूंचे  चिन्मय पादुकापूजन,नंतर बापूंची आरती, पुढे श्री गुरुक्षेत्रममंत्र,आन्हिक,त्यानंतर श्रीमद पुरुषार्थ प्रथम खंडातील भावपूर्ण प्रार्थना क्र.१०(पान२१३), श्री अनिरुद्ध चालिसा,श्री हनुमान चालिसा, नंतर श्रीसाईसच्चरित अध्याय, मातृवात्सल्यविंदानम अध्याय, तृतीय खंडातील आचमने, श्रीगुरूचरित्राचा `भक्तिरसाने भरपूर रसरसलेला`अध्याय १४ वा आणि अध्याय १८ वा या क्रमाने भक्तीचा प्रवास येतो `हरिपाठ` या सुंदर स्थानकावर... 
पादुकापूजनाचे वेळी, दिवसभराचे पठण करताना,कोणतीही सेवा करत असताना प्रत्येक श्रद्धावानाच्या चेहऱ्यावरील तृप्त,प्रसन्न भाव या सप्ताहाच्या यशस्वितेची साक्ष देतात.आज शनिवार नित्य उपासना ही सप्ताहस्थळीच घेतली गेल्याने `चुकले भागलेले` ही आलेले होते. ज्यांनी ज्यांनी म्हणून या सप्ताहात मनापासून सहभाग घेतला त्यांना बापूंनी सर्व काही दिलेले आहे...`जे आले ते भरुनी गेले...`हे नक्की ! आज `चरखा` अखंड सुरूच होता. 175  लडीचा कालसारखाच स्कोर..उद्याअखेर  1000 लडी पूर्ण व्हाव्यात ही प्रार्थना..     
`मायेची उब` अंतर्गत 20 गोधड्या शिवून तयार..
 `जुनं ते सोनं` अंतर्गत आज 595 कुटुंबातील 2020 व्यक्तींच्या कपड्यांचे sorting व packing करण्यात आले...खरंच ह्या कक्षाला थोडाही विसावा नाही...

`गणेश मूर्ती` सेवेत आज खूपच धांदल होती. सर्व वयोगटातील सर्व श्रद्धावान विविध कामात मग्न होते. 35 मूर्तीचं फिनिशिंग झाले.75 मूर्तीचं अंशतः रंगकाम तर झालंच पण विशेष म्हणजे तीन गणेश मूर्ती पूर्ण रंगवून झाल्या.तर बऱ्याचशा पूर्णावस्थेत येत आहेत.. 
---------------------------------------------------------------------
 आज सप्ताहाचा संपन्न दिन.!
केंद्राच्या इतिहासात सेवेचं शिखर गाठणारा...! काल रात्रौ 10  ते 2 .15 या वेळात कार्यकर्त्यांनी जीव तोडून केलेल्या मेहनतीने बापू नक्कीच सुखावले असणार... `वसे तो सदा स्वेदगंगेकिनारी` ! तब्बल सात ट्रक भरले वाटप करावयाच्या कपड्यांनी...हे सर्व साहित्य घेऊन सकाळी 6.30 वाजता सात टीम्स सात दिशांना रवाना झाल्या. रेकॉर्ड ब्रेक वाटप करून सर्व मंडळी दिवसभराच्या वेगवेगळ्या वेळी उपक्रमस्थळी पोहोचत होती. या सप्ताहाची पुण्यातील प्रसारमाध्यमांनीदेखील  दाखल घेतली .त्यात दै.`म.टा`,सकाळ ,पुढारी ही वर्तमानपत्रे तसेच `स्टार माझा`,`IBN लोकमत` या वृत्तपत्रवाहिन्यांचा समावेश होता. याचा परिणाम म्हणावा की बापूंची योजना, असंख्य पुणेकरांनी `जुनं ते सोनं` साठी आपले कपडे सप्ताहस्थळी आणून  आधीच्या  रात्रौ clear केलेला stock नव्याने निर्माण केला.कपडे देण्यासाठी आलेल्या सर्व नागरिकांनी सप्ताहाची आणि बापूकार्याची संपूर्ण माहिती घेतली.आपले कार्यकर्ते अगदी तळमळीनं बापूमहिमा सांगताना दिसत होते. या सप्ताहात नवीन श्रद्धावानांची भर पडावी या हेतूने बापूंनी ही योजना आखली होती याची खात्री पटली.मुख्य हॉलमध्ये आज,कार्यकर्त्यांनी रात्रभर खपून,विशेष सजावट केलेली होती.बापूंच्या मांडणीच्या दोन्ही बाजूंना दोन नौका करण्यात आल्या होत्या, भक्ती-सेवेचे वल्हे असलेल्या...त्यात सप्ताहात वापरलेली भक्ती आणि सेवेची सर्व साधने ठेवण्यात आली होती. रामराज्याच्या दिशेने निघालेल्या नौका...! विश्वातला एकमेव `अनिरुद्ध` नावाडी असणाऱ्या नौका.. आपल्या जीवनाची नौका चालवणारा नावाडी, `अनिरुद्ध` नावाडी..! या सुंदर आणि अदभुत वातावरणात जेव्हा `हरिपाठ` सुरु झाला तेव्हा खात्रीने सांगतो, माझे बापू, नंदाई आणि माझे सुचितदादा यांचे वास्तव्य भले  मुंबईत असो, अस्तित्व मात्र पुण्यातच होते....!                                                                                                                                                       
या संपूर्ण सप्ताहात झालेल्या विविध सेवा-कार्याचा तपशील....( दिल थाम के बैठो..!)
`मायेची ऊब` योजना - एकूण १४८ गोधड्या तयार
`चरखा` योजना - 1111 लडी
`गणेशमूर्ती` सेवा -  250 मूर्ती फिनिशिंग,  लगद्याचे 400 गोळे तयार आणि 22 मूर्ती 80 % तयार,3 मूर्ती   संपूर्ण                                    तयार.
 `जुनं ते सोनं` योजना -  तब्बल 11 ,500  लाभार्थी...!  
`अनिरुद्धार्पणमस्तु` ....! 


Thursday, April 21, 2011

आद्यपिपा

 आद्यपिपा
पीपीलिका पंथावरून चालायचे तर मुंगीच्या आकारात राहिलं पाहिजे जेथे आकारमान वाढल कि तो रस्ता मूळी तुमचा उरतच नाही आद्यपिपा श्री सुरेशचंद्र दत्तोंपाध्ये वरील शब्दात आपल्याला यशस्वी जीवनाचा अर्थ समजून सांगत आहेत. १९४० साली म्हणजे वयाच्या सातव्या वर्षी ते आपल्या वडिलांबरोबर शिर्डीला गेले असताना साईनाथांच्या दर्शनानंतर त्याच्या वडिलांनी त्यांना उदी दिली व द्वारकामाईत त्यांना उदीच महत्व समजावून सागितलं. आद्यपिपानी ते नीट ग्रहण केले व उदीच्या काणासारखे लहान बनून साईची भक्ती करायची हा संकेत त्यांनी साईच्या साक्षीने केला. पुढे साई चरित्र्याचे नित्य वाचन व चितन हाच त्यांचा श्वास झाला. म्हणूनच सातत्याने साठ वर्ष त्यांनी साइचरीत्र्याची पारायणे गुरुपोर्णिमा, गोकुळाष्टमी, दसरा व रामनवमी या उत्सवाच्या वेळी न चुकता केली. आद्यपिपानी श्री साईनाथाच्या चरणी 'मला देहधारी साई हवा ' अशी प्रार्थना केली आणि साईनाथानी ती पूर्ण केली. असा साईनाथ त्यांना अनिरुद्ध रुपात मिळाला आणि तेथूनच त्याच्या अतरगातील भक्तीचा मळा फुलून साठ वर्षाचे आई प्रेम सत्य उतरला व आद्यपिपा अनिरुद्ध प्रेमसागरात डुबून गेले. पिपासा प्रगटली ती अशी बाल जसा आपल्या आईवर सत्ता गाजवते तशी सत्ता मला माझ्या देवावर गाजवता आली पाहिजे. हे बाळ होणं म्हणजेच पिपीलिका पाथ हे त्यांनी जाणले व आयुष्यभर तसेच जगले. मानपान, प्रसिद्धी व मोठेपणा यापासून ते कायम दूर राहिले आपले दोन्ही पूत्र सूचितदादा  व समिरदादा यांना लहानपणी भक्तीची गोडी लागावी व ते भक्ती बीज त्यांनी त्य्च्यात प्रेमाने वाढवलं परमपूज्य सूचितदादा व परमपूज्य समीरदादा यांना घडविणाऱ्या आद्यपिपाची थोरवी काय वर्णावी ह्या कमी त्याची प्रेमळ पत्नी सौ. सुभदावीरा याचीही मोलाची साथ मिळाली. आद्यपिपांच्या प्रेमाने देव तृप्त झाला आणि १३ नो. २००० रोजी सदगुरू अनिरुद्धानी सुरेशचंद्र वैद्य ह्यांची पिपीलिका पाथस्थ या पदावर निय़ुक्ती केली. 
आद्यपिपाच मृदू प्रेमळ बोलणं त्याच्या देवाने त्याच्यावर केलेलं अनंत प्रेम अखेरच्या क्षणी भक्तीरुपि्णी नंदाआईचा त्यांना मिळालेला प्रत्यक्ष आशीर्वाद त्यांच्या प्रेम भक्तीची साक्ष देते. 
ते नित्य करीत असलेल्या श्री साईसच्चरीत पारायण समाप्तीच्या श्री अनिरुद्ध चरणी विलीन झाले. 
आद्यपिपाच्या निर्वाणानंतर त्याची समाधी श्री क्षेत्र गुरुकुल जुईनगर येथे १९ एप्रिल २००७ रोजी परमपूज्य अनिरुद्ध बापू, परमपूज्य नंदाई, परमपूज्य सूचितदादा व समीरदादा आद्यपिपाची पत्नी व दोन्ही दादाची आई शुभदावीरा यांच्या उपस्थितीत समाधी भक्तांना दर्शनासाठी उपलब्ध झाली. 
आद्यपिपानि देलेली उदी या समाधीत टाकण्यात आली आहे ह्या समाधीला असलेल्या सहा पायऱ्या म्हणजेच 'धर्म', "अर्थ',"काम',"मोक्ष',"भक्ती' व मर्यादा पुरुषार्थ मार्गाची साक्ष देतात. समाधीवर आद्यपिपा पारायण करीत असलेल्या श्री साईसच्चरीत ग्रंथ ठेवण्यात आला आहे. समाधीच्यामागे श्री साईनाथाचा फोटो लावला आहे तर समाधी समोर रंगशीळा आहे. या रंगाशीळेवर कान पकडून उभे राहून व उड्या मारत मला माझ्या चुकीची कबुली श्री साईनाथांसमोर देता येते. 
हि माहिती गुरुशेत्राम येथील आहे.

Thursday, March 17, 2011

PIPA DADA --appeared for his higher secondary certificate (HSC) exam

Senior citizen in Mumbai writes HSC exam
Published: Wednesday, Mar 16, 2011, 23:22 IST
By Yogita Rao | Place: Mumbai | Agency: DNA

Sixty-eight-year-old Govind G Dabholkar, grandfather of two, appeared for his higher secondary certificate (HSC) examination in commerce this year.
He appeared for his last paper on Wednesday at a centre in Lalbaug, in a class full of 18-year-olds.
Dabholkar is the grandson of Govind R Dabholkar, popularly known as Hemadpant, who penned Sri Sai Satcharita, the Marathi biography of Shirdi Sai Baba.

While his grandfather was a magistrate, the junior Dabholkar could not clear his first year in junior college and discontinued studies. After clearing his exam in radiotelephony, he joined an airline company. He retired as deputy manager (flight operations) in Indian Airlines and now keeps himself busy with social work.
A staunch follower of Anirudhha Bapu, a local godman, Dabholkar observed that most of Bapu’s followers are learned and educated, and so decided to appear for his board exams so he could pursue his higher studies.
Dabholkar, who resides in Sai Niwas in Bandra, is known as Appa Dabholkar. “Our family is known for our devotion to Shirdi Sai. I decided to continue to my studies under his blessings.
There is no age bar for completing education in life. So I took coaching from a couple of lecturers at Chetana College and registered as a private candidate from a junior college in Tardeo,”
he said.

He appeared for his papers from his centre at VL Nappu High School and Junior College, Chinchpokli. “I wish to complete my graduation in commerce and may continue to pursue studies further. Members in my family are all well-educated, but I never got a chance to continue my studies.
After getting a job, I got married and settled with my wife and children and got busy with family life. There were property-related court cases that I had to fight. My wife has expired and my children have settled in life now. With Bapu’s blessings, I wish to clear the exams with good scores,” said Dabholkar.

Wednesday, March 16, 2011

'Radioactive' alerts spread panic

'Radioactive' alerts spread panic

MUMBAI: Even as Japan faces a nuclear crisis, mobile phones in Mumbai have started beeping with bogus SMSes warning of radioactive rain. This is not the first time that fear-mongering text messages have done the rounds of the city. When the AIDS epidemic was at its height, chain mails warned of deadly syringes filled with infected blood that were being kept on dimly lit seats at cinema theatres. They spread panic among citizens. Do these messages have a noble aim or is unrest their only agenda? While sociologists and doctors say that urban legends usually have a social message, it is often exaggerated and not medically true. Consider the Japan-centric SMS which reads: "There was a nuclear blast at 4.30 pm on Sunday in Fukushima, Japan. If it rains today or in the next few days, do not go under the rain (sic)." The reason? "Radioactive particles which cause burns, alopecia or even cancer may be in the rains."