Saturday, October 2, 2010

एसटी महागली --- प्रवासी भाड्यात वाढ

एसटी महागली
प्रवासी भाड्यात वाढ 

 

सामान्य नागरिकांच्या प्रवासाचे उत्तम साधन  असलेल्या एसटी च्या भाड्यात वाढ करण्यास सरकारने मंजुरी दिली असून या मूळ सामान्य नागरीकाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ४ ऑक्टोबरपासून एसटीच्या भाड्यात चार टक्के भाडेवाढ होणार आहे.
सहा किमीच्या पुढील प्रवासासाठी हि भाडेवाढ लागु कारण्यात आली आहे .  सुमारे १५ हजारांहून अधिक बसेसमधून दररोज प्रवास करणा-या राज्यातील कोटय़वधी प्रवाशांना या भाडेवाढीचा फटका बसणार आहे. कामगार करार आणि महागाई भत्ता यांचं कारण देत एसटीने मार्च महिन्यात ७.६९ टक्क्यांची भाडेवाढ केली होती. परंतु आता
डिझेलच्या वाढत्या दराचे कारण देण्यात येत आहे.

महत्वाचे म्हणजे
राज्य शासनाचा प्रवासी कर या भाडेवाढीस कारणीभूत असल्याचं उघड झाला आहे.

No comments:

Post a Comment