Thursday, April 21, 2011

आद्यपिपा

 आद्यपिपा
पीपीलिका पंथावरून चालायचे तर मुंगीच्या आकारात राहिलं पाहिजे जेथे आकारमान वाढल कि तो रस्ता मूळी तुमचा उरतच नाही आद्यपिपा श्री सुरेशचंद्र दत्तोंपाध्ये वरील शब्दात आपल्याला यशस्वी जीवनाचा अर्थ समजून सांगत आहेत. १९४० साली म्हणजे वयाच्या सातव्या वर्षी ते आपल्या वडिलांबरोबर शिर्डीला गेले असताना साईनाथांच्या दर्शनानंतर त्याच्या वडिलांनी त्यांना उदी दिली व द्वारकामाईत त्यांना उदीच महत्व समजावून सागितलं. आद्यपिपानी ते नीट ग्रहण केले व उदीच्या काणासारखे लहान बनून साईची भक्ती करायची हा संकेत त्यांनी साईच्या साक्षीने केला. पुढे साई चरित्र्याचे नित्य वाचन व चितन हाच त्यांचा श्वास झाला. म्हणूनच सातत्याने साठ वर्ष त्यांनी साइचरीत्र्याची पारायणे गुरुपोर्णिमा, गोकुळाष्टमी, दसरा व रामनवमी या उत्सवाच्या वेळी न चुकता केली. आद्यपिपानी श्री साईनाथाच्या चरणी 'मला देहधारी साई हवा ' अशी प्रार्थना केली आणि साईनाथानी ती पूर्ण केली. असा साईनाथ त्यांना अनिरुद्ध रुपात मिळाला आणि तेथूनच त्याच्या अतरगातील भक्तीचा मळा फुलून साठ वर्षाचे आई प्रेम सत्य उतरला व आद्यपिपा अनिरुद्ध प्रेमसागरात डुबून गेले. पिपासा प्रगटली ती अशी बाल जसा आपल्या आईवर सत्ता गाजवते तशी सत्ता मला माझ्या देवावर गाजवता आली पाहिजे. हे बाळ होणं म्हणजेच पिपीलिका पाथ हे त्यांनी जाणले व आयुष्यभर तसेच जगले. मानपान, प्रसिद्धी व मोठेपणा यापासून ते कायम दूर राहिले आपले दोन्ही पूत्र सूचितदादा  व समिरदादा यांना लहानपणी भक्तीची गोडी लागावी व ते भक्ती बीज त्यांनी त्य्च्यात प्रेमाने वाढवलं परमपूज्य सूचितदादा व परमपूज्य समीरदादा यांना घडविणाऱ्या आद्यपिपाची थोरवी काय वर्णावी ह्या कमी त्याची प्रेमळ पत्नी सौ. सुभदावीरा याचीही मोलाची साथ मिळाली. आद्यपिपांच्या प्रेमाने देव तृप्त झाला आणि १३ नो. २००० रोजी सदगुरू अनिरुद्धानी सुरेशचंद्र वैद्य ह्यांची पिपीलिका पाथस्थ या पदावर निय़ुक्ती केली. 
आद्यपिपाच मृदू प्रेमळ बोलणं त्याच्या देवाने त्याच्यावर केलेलं अनंत प्रेम अखेरच्या क्षणी भक्तीरुपि्णी नंदाआईचा त्यांना मिळालेला प्रत्यक्ष आशीर्वाद त्यांच्या प्रेम भक्तीची साक्ष देते. 
ते नित्य करीत असलेल्या श्री साईसच्चरीत पारायण समाप्तीच्या श्री अनिरुद्ध चरणी विलीन झाले. 
आद्यपिपाच्या निर्वाणानंतर त्याची समाधी श्री क्षेत्र गुरुकुल जुईनगर येथे १९ एप्रिल २००७ रोजी परमपूज्य अनिरुद्ध बापू, परमपूज्य नंदाई, परमपूज्य सूचितदादा व समीरदादा आद्यपिपाची पत्नी व दोन्ही दादाची आई शुभदावीरा यांच्या उपस्थितीत समाधी भक्तांना दर्शनासाठी उपलब्ध झाली. 
आद्यपिपानि देलेली उदी या समाधीत टाकण्यात आली आहे ह्या समाधीला असलेल्या सहा पायऱ्या म्हणजेच 'धर्म', "अर्थ',"काम',"मोक्ष',"भक्ती' व मर्यादा पुरुषार्थ मार्गाची साक्ष देतात. समाधीवर आद्यपिपा पारायण करीत असलेल्या श्री साईसच्चरीत ग्रंथ ठेवण्यात आला आहे. समाधीच्यामागे श्री साईनाथाचा फोटो लावला आहे तर समाधी समोर रंगशीळा आहे. या रंगाशीळेवर कान पकडून उभे राहून व उड्या मारत मला माझ्या चुकीची कबुली श्री साईनाथांसमोर देता येते. 
हि माहिती गुरुशेत्राम येथील आहे.