Tuesday, September 14, 2010

लहान घरे उभारणे बंधनकारक

 लहान घरे उभारणे बिल्डरांना बंधनकारक

ध्यम वर्गीयानी शहर किंवा उपनगरात घर घेने म्हणजे स्वप्नं पाहण्यासारखे आहे. मग आथिर्क दुर्बलांनी तर तसे स्वप्नही पाहाणे म्हणजे ? असो परतू आता सरकारने नव्या 

गृहप्रकल्पांत या वर्गासाठी किमान ३५० ते कमाल एक हजार चौरस फुटांची २० ते २५ टक्के घरे 

राखीव ठेवणे बिल्डरांना बंधनकारक करणारा आदेश जरी केला आहे. त्यामुळे आता हा वर्ग देखील  शहर किंवा उपनगरात घर घेण्याचे स्वप्नं पाहू शकतो .
मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नव्या घराचे स्वप्न दाखवणाऱ्या या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. आता या आदेशाची अंमलबजावणी काटेकोर पणे झाल्यास मध्यम वर्गीयानी नक्की घरे उपलब्ध होतील.
कनिष्ठ मध्यमवर्ग या घटकांकरिता एकूण फ्लॅटपैकी २० ते २५ टक्के घरे उपलब्ध करून देणे

बिल्डरांवर बंधनकारक केले आहे. त्यामुळे या समाजघटकांना किमान ३५० ते कमाल ५५० 

चौरस फूट क्षेत्रफळाची टू बीएचके व थ्री बीएचके घरे उपलब्ध होतील. मध्यमवगीर्यांना १० टक्के 

घरे देणे बांधकाम व्यावसायिकांना सक्तीचे असणार आहे. त्यामुळे मध्यमवगीर्यांना अडीच 

बीएचकेची ६०० ते १००० चौरस फूट क्षेत्रफळाची घरे उपलब्ध होतील.


आथिर्क दुर्बल व कनिष्ठ मध्यमवर्गासाठी...

३५० ते ५५० चौरस फूट
 
टू बीएचके, थ्री बीएचके

मध्यमवर्गासाठी...

६०० ते १००० चौरस फूट
 
अडीच बीएचके


No comments:

Post a Comment