Sunday, August 29, 2010

मी आणि माझा साहेब

मी आणि माझा साहेब
 
मला जर काम संपवायला उशीर लागला ….  तर मी चेंगट आहे.
माझा साहेब जेंव्हा जास्त वेळ लावतो ….. तो सर्वंकष काम करतो.

मी एकादे काम केले नाही  ….. तर मी आळशी असतो.
त्याने केले नाही तर तो इतर कामात गुंतलेला असतो.

कोणीही मला न सांगता मी आपणहून एकादे काम केले ..  तर मी जादा हुषारी दाखवायचा प्रयत्न करतो.
माझा साहेब जेंव्हा तेच करतो तो पुढाकार घेतो.

मी माझ्या साहेबाला संतुष्ट करतो तेंव्हा मी त्याला मस्का मारतो.
माझा साहेब त्याच्या साहेबाला खूष करतो तेंव्हा तो सहकार्य करतो.

जेंव्हा माझ्याकडून चूक होते .. तेंव्हा मी गाढव ठरतो
माझा साहेब चूक करतो .. तो मानवी स्वभावधर्म असतो.

मी जेंव्हा ऑफिसच्या बाहेर असतो .. तेंव्हा ती माझी स्वैर भटकंती असते.
माझा साहेब मात्र नेहमी व्यावसायिक कारणांसाठीच ऑफीसच्या बाहेर गेलेला असतो.

मी एक दिवसाची सिकलीव्ह घेतली मी सदा न कदा आजारी असतो
माझा साहेब एक दिवस आला नाही तर त्याची परिस्थिती गंभीर असते.

मी रजेसाठी अर्ज टाकला तर मी (दुसरीकडे) इंटरव्ह्यूला जाणार असतो.
माझ्या साहेबाने रजा मागितली .. त्याला अतीश्रमाने थकवा आलेला असतो.

जेंव्हा मी चांगला असतो ती गोष्ट माझ्या साहेबाच्या लक्षात रहात नाही
मी जेंव्हा चूक करतो माझा साहेब ते कधीच विसरत नाही.

मी आता करू तरी काय ????????? ???

2 comments:

  1. are thodyach divsat ha problem solve hoyel me tujhi he talmal sahebaparyant pahchvato ahe.....

    ReplyDelete
  2. ATA TU KAY KARU NAKO FAKT KARMA KART RAHA ANI FALACHI APEKSHA KAR

    ReplyDelete